मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

सोमवार, ९ जून, २०२५

घरकुल

 



एखादं झाड मुळापासून तोडायचे व दुसऱ्या जागी तेच झाड लावायचे म्हटले तर ते लागेल का हो ..?जगेल का हो ते झाड ? तुम्हीच सांगा शांताताई हे शक्य आहे का ?”

म्हणजे काय हो .. मला समजले नाही .. कश्या बद्दल बोलत आहात तुम्ही ..”

माझा मुलगा म्हणतो आपण सगळे मुंबईला शिफ्ट होऊ , मी इथे एकटी रहायला तयार आहे पण तो मला इथे ठेवायला तयार नाही , माझी त्याला काळजी वाटते .. माझं मन लागणार नाही हो तिथे ..” डोळे पुसत नयना ताई बोलत होत्या .

मूळापासून ते झाड लागेल की नाही माहीत नाही पण नव्याने नक्कीच रुजू शकेल , काळजी करू नका सगळं चांगलेच होईल , या वयात मुलांची सोय बघायची , मुलं आपल्यावर खूप प्रेम करतात हो , त्यांना आपणच समजून घेणार ना ..”

एवढ्यात शांताताई चा फोन वाजला , “ हो , हो घरीच येत आहे .”

अंधार पडला म्हणून दोघी ना आपापल्या घरी नाईलाजाने जावे लागले .

नयनाताईची ही अवस्था पाहून शांताबाईला आपली दोन वर्षापूर्वीची अवस्था आठवली ..

आपण त्यांना हे समजावत आहोत पण इथे येण्यापूर्वी आपलीही हीच अवस्था झाली होती . मागच्या दोन वर्षापूर्वीचा काळ झरकण डोळ्यासमोर उभा राहिला .

शांताबाई जवळपास सत्तर वर्षांच्या होत्या. गोऱ्यापान , सरळ नाक, पांढराशुभ्र केसांचा अंबाडा, वयानुरूप थोडं वाकलेलं पण कामात चपळ शरीर. त्यांचा बंगलाही अगदी त्यांच्यासारखा होता—जुनाट पण जिवंत. तो बंगला त्यांच्या लग्नात सासरकडून मिळाला होता. मोठं अंगण, पाच खोल्या, मागे बाग, आणि समोर एक छोटंसं तुळशीवृंदावन.

त्या आणि श्यामराव —त्यांचे पती—लग्नानंतर इथेच राहायला आले होते . सुरुवातीचे काही वर्षं आर्थिक चणचणीत गेले पण दोघांनी मिळून संसार फुलवला. श्यामराव पोस्टात होते, आणि शांताबाई घरातली सारी जबाबदारी सांभाळायच्या.

त्यांना दोन मुले झाली—अनिकेत आणि वैशाली. शिक्षणासाठी ती दोघं पुण्याला गेली आणि तिथेच सेटल झाली.

श्यामराव निवृत्त झाले आणि काही वर्षांनी अल्पश्या आजारपणामुळे देवाघरी  गेले. शांताबाईंसाठी तो मोठा धक्का होता. पण त्यांनी खचून न जाता सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांचा खऱ्या अर्थाने आधार ठरल्या —त्या वास्तूतील आठवणी, श्यामरावांचा आवाज अजूनही त्या वास्तूत घुमत होता , अंगणातलं झाड, सकाळी गाणी म्हणत झाडांना पाणी घालणं, आणि पक्ष्यांची किलबिल.

सकाळी सकाळी चहा घेताना चिमण्या जणू त्यांच्या सोबत गप्पा मारायलाच येत असत



वर्षा नंतर वर्ष सरली. जवळपास दहा वर्ष शांताताई ने ऐकटीने काढली तेही आनंदात पण शरीर आता साथ देत नव्हतं. पाठीला त्रास, डोळ्यांना कमी दिसणं, जेवण बनवणंही जड वाटू लागलं होतं .

अनिकेत आणि वैशाली दोघंही तिची काळजी घेत होते—फोन करून, औषधं पाठवून, मदतनीस ठेवून. पण शेवटी मुलांसाठी ही चिंता वाढत चालली होती . आई ला खऱ्या अर्थाने आपली साथ हवी आहे याची जाणीव दोघा ना झाली

एक दिवस अनिकेत आणि वैशाली दोघेही आले आणि म्हणाले,” आई , आता प्लीज नाही म्हणू नको , आम्ही तुला घ्यायला आलो आहोत .”

ती शांत राहिली. आवाज केला नाही. पण तिचं मन आतून हादरलं होतं.

वैशालीने आईचा हातात हात घेतला स्पर्श बोलून गेला . शांतताही बरेच बोलून गेली

त्या दिवशी शांताबाई अंगणात बसून झाडांशी बोलत होत्या .

तुला आठवतं का मोगऱ्याच्या फांद्या कापल्या तेव्हा दत्ता किती रागावला होता?”

त्या हळूहळू त्यांच्या वस्तू गोळा करत होत्या . प्रत्येक वस्तू त्यांना एका आठवणीत नेत होती. कपाट उघडताच श्यामरावांचा रूमाल सापडला. त्यांच्या सुगंधाने डोळे भरून आले.

तू कुठे गेलास रे… मी कशी जाईन इथून?”

आसवं थांबेनात. मुलं समजावत होती, पण त्यांच्या डोळ्यातही ओल होती. त्यांना कळत होतं—ती केवळ घर सोडत नव्हती, एक युग सोडत होती.

सुरुवातीला वैशाली हट्टा ने आपल्या घरी घेऊन गेली

तिचा फ्लॅट मोठा होता. वैशालीने आईसाठी वेगळी खोली सजवली होती—झाडांची कुंडी, फोटो, एक लहान देवघर.

पण तरीही काहीतरी हरवत होतं. सकाळी चहा घेऊन बाल्कनीत बसायची शांताबाईंची सवय आता टॉवरच्या बाल्कनीत गुदमराय लागली. आजूबाजूला फक्त ट्रॅफिकचा आवाज, ना मातीचा वास, ना पक्ष्यांची किलबिल.

एक दिवस शांताबाईंनी वैशालीला विचारलं,” काय ग तुमच्याकडे पक्षी येतच नाहीत का.. झाडच कुठे दिसत नाही तर पक्षी कसे येतील ..”

अगं आई जागा कुठे आहे झाडाला .. इथे माणसाला रहायला जागा नाही , झाडे कुठे लावणार ..”

इथेच तुमची पिढी चुकते .. झाडे जंगली तर तुम्ही जगणार ना ..”

वैशाली गप्प झाली. तिला काय उत्तर द्यायचं कळेना.

शांताबाईंना कधी कधी राग यायचा. मुलं चांगली होती, प्रेम करत होती, पण…

आधी मी माझ्या घरात राणी होते. इथे मी पाहुणी आहे.”

अनिकेत एका संध्याकाळी आईजवळ बसला. तो म्हणाला, “ आई मला माहीत आहे तुला इथे आवडत नाही , तुझे मन रमत नाही पण आमचा नाईलाज आहे . आम्हाला आता आमच्या आईची साथ हवी आहे. तुझी सेवा करायची संधी आम्हाला हवी आहे . तू आनंदात राहशील तर आम्हाला पण बरे वाटेल ..”

वैशालीने आईचा हात हातात घेत बोलली “आई, तुला कळतंय ना… आम्ही हे सगळं प्रेमाने केलंय. आम्हालाही त्रास होतो… पण तुझं आरोग्य, तुझी काळजी आम्हाला अधिक महत्वाची वाटली.”

शांताबाई थोड्या वेळ गप्प राहिल्या. मग म्हणाल्या,

माझी चूक नाही. तुमचीही नाही. पण हे घर मला बोलत नाही. माझ्याशी बोलणं हीच माझी गरज होती.”

शांताबाई थोड्या वेळ गप्प राहिल्या. मग म्हणाल्या, “आधी मी माझ्या घरात राणी होते. इथे मी पाहुणी आहे. मला इथे आपलेपणा वाटत नाही . काहीतरी चुकल्या सारखे वाटते. बाळा, मी नक्की प्रयत्न करेन हे सगळे मनापासून स्वीकारायचा , मला फक्त थोडा वेळ द्या .. "

माझी चूक नाही. तुमचीही नाही. पण हे घर मला बोलत नाही. माझ्याशी बोलणं हीच माझी ग

हळूहळू वेळ सरत होता. वैशालीने तिच्या घरात पक्ष्यांचे घरटे आणले .रोज पक्षी दाणे खायला बाल्कनी मध्ये येऊ लागले . कुंड्यांची संख्या वाढली. रोपट्यांची संवाद होऊ लागला . शांताबाईंना तिथं सकाळी बसायचं ठिकाण मिळालं. तिथं बसून त्या ओल्या मातीवर हात फिरवायच्या. झाडांचा मातीचा सुगंध त्यांच्यात उत्साह निर्माण 

अनिकेतच्या मुलाने एकदा विचारलं,


आजी, तुला गावचं घर आवडायचं का?”
हो रे बाळा… ते घर माझं नव्हतं, मी त्याची होते.”

शांता ताई त्याला आपल्या जुन्या घराच्या गोष्टी सांगू लागल्या आणि त्या सांगताना त्यांचा चेहरा हसरा दिसू लागला. कधी कधी, रात्री एकट्या असताना त्यांचे डोळे पाणावायचे, पण सकाळी पुन्हा त्या नव्या दिवसाला सामोऱ्या जायच्या.

शांताबाईने एक दिवस वैशाली आणि अनिकेतला बोलावून सांगितलं, ““हे नवीन घरही आता माझं आहे. कारण इथं माझ्या माणसांचं प्रेम आहे.


पण माझं जुनं घर… त्याला मी विसरू शकत नाही. ते माझ्या आठवणीत आहे, हृदयात आहे.”

दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं.

आई, आम्ही तुझ्या भावना समजतो. कधी वाटलं तर जाऊ या पुन्हा गावाला… तुझ्या घरात.”

ती फक्त हसली.

गरज नाही. तुम्ही जवळ आहात, हेच घरकुल माझं आहे.” 
दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं.

आई,ती फक्त हसली.

ही कथा आहे एका स्त्रीची, जिने केवळ घर नाही, तर आठवणी, प्रेम, संवाद आणि त्याग जोपासले. वृद्धापकाळ म्हणजे अशक्तपणा नव्हे, तर भावनांचं गूढ वळण असतं.

मुलांनीही आपल्या कर्तव्याला प्रेमाची किनार दिली आणि एक वृद्ध आईचा “नाईलाज” जिथे “स्वीकृती” झाला, तिथे घर नव्हे, मनात घर केलं गेलं…

मूळापासून ते झाड काढले गेले नाही तर ते झाड नव्याने रुजायला सुरुवात झाले .

उद्या नयनाताई सोबत हा विषय कसा बोलायचा ह्याचा विचार शांताताई करू लागल्या




४ टिप्पण्या:

comment

नक्की वाचा

सावलीच्या आठवणी

  आज बाजारात पूजेच्या सामानाची गर्दी होती . बायकांची लगबग  चालू होती . बाजारातील ती गर्दी बघून वसंतराव ए का मिनिटासाठी स्तब्ध उभे राहिले ....

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template